महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एनआरसी (NRC) बाबत एक मोठे विधान केले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले. पण एनआरसीला विरोध केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले आहे ती. नागरिकत्व सुधारणा कायदा हा एखाद्याचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आहे. तसेच बाजूच्या देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व दिले जाईल. आम्ही सीएएच्या समर्थनात आहोत. एनआरसी मात्र महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही आहे.
जर राज्यात एनआरसी लागू केल्यास हिंदू आणि मुस्लिम बांधवांना त्यांचे नागरिकत्व सत्य करुन दाखवावे लागेल. त्यामुळेच एनआरसी हे महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही. शिवसेनेने हिंदुत्वाची विचारधारा सोडली नाही आहे. तसेच त्यासोबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. आम्ही गठबंधन केले म्हणून आम्ही धर्म बदल केलेले नाही असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.(उर्मिला मातोंडकर ची CAA वर टीका; Rowlatt Act सोबत तुलना करत इतिहासात 'काळा कायदा' म्हणून नोंद होईल अशी टीपण्णी)
दिल्लीतील शाहीनबागसह अन्य ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात घोषणा देण्यात येत आहेत. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एनआरसी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे. सीएए आणि एनआरसी मुद्द्यावर काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षाकडून मोदी सरकारच्या समोर उभा आहे. पण काही राज्यात सीएए आणि एनआरसी लागू करण्यात आला आहे.