कोविड-19 च्या  संकटात Patym कडून 3 लाख Hygiene Products ची मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार
CM Uddhav Thackeray | (Photo Credits-Twitter)

भारतात कोविड-19 (Covid-19) ग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांचा आकडा सर्वात अधिक आहे. तसंच त्यात दिवसागणित भर पडत आहे. दरम्यान कोविड-19 च्या या कठीण काळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आता पेटीएमने (Paytm) देखील कोरोना व्हायरसच्या संकट काळात आपले योगदान दिले आहे. पेटीएमने पुढाकार घेत एक मोहिम सुरु केली होती. त्यात लाईफबॉय सोप (Lifebuoy) आणि युव्हीकॅन (YouWeCan) यांनी देखील पेटीएमला मोठी साथ दिली. यांनी एकत्रितपणे 3 लाख हायजिन प्रॉडक्ट्स (Hygiene Products) महाराष्ट्र सरकारला पुरवले. पेटीएमच्या या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पेटीएमचे आभार मानले आहेत. तसंच पेटीएम युजर्संना देखील धन्यवाद दिले आहेत.

पेटीएम ने 'India Fights Corona' या मोहीमेला सुरुवात केली होती. या मोहिमेअंतर्गत पेटीएम अॅप आणि वेबसाईटवर डोनेशन करण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्याद्वारे अनेक पेटीएम युजर्सने आपल्या परीने मदत केली. या डोनेशमधून जमलेल्या रक्कमेतून सरकारला हायजिन प्रॉडक्सची मदत करण्यात आली. (Covid-19 संकटात Hindustan Unilever कंपनीकडून 10 कोटीहून अधिक वैद्यकीय संसाधनांची मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार)

CMO Maharashtra Tweet:

दरम्यान जगासह भारतावर कोरोना व्हायरसचे गंभीर संकट ओढावले आहे. भारतात कोविड-19 ने शिरकाव केला आणि आपली व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली. आता देशातील कोरोना बाधितांचा आकडा 246628 इतका मोठा झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने इटली, स्पेन या देशांनाही मागे टाकले आहे.