मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजुरी; 'अशी' आहे प्रस्तावित  यादी
Maharashtra CM Uddhav Thackeray | (Photo Credits: PTI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारची सत्ता स्थापना, शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यावर मागील अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून होते ते खातेवाटपावर.तीन पक्षांचं सरकार असल्याने आता पर्यंत प्रत्येकाची मनधरणी करत असताना खाते वाटपासाठी विलंब झाला होता, मधल्या वेळेत सोशल मीडिया सहित माध्यमांमध्ये संभाव्य खातेवाटपाच्या याद्या देखील प्रसारित करण्यात आल्या होत्या पण, याबाबत अधिकृत माहिती समोर येत नव्हती. मात्र आज, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांच्या राजभवनाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरे सरकारच्या खातेवाटपाच्या प्रस्तावाला राज्यपाल कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याने आज कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होण्याची पूर्ण शक्यता आहे.

पहा ट्विट

तत्पूर्वी खातेवाटपाच्या प्रास्तवित यादीवर आपण एक नजर टाकणार आहोत...

प्राप्त माहितीनुसार, प्रस्तावित खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक दिसून येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त व नियोजन खाते, जयंत पाटील यांना जलसंपदा खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते, अनिल देशमुख यांना गृहमंत्रालय, दिलीप वळसे-पाटील यांना कामगार व उत्पादन शुल्क खाते, नवाब मलिक यांना अल्पसंख्याक व कौशल्य विकास खाते, राजेश टोपे यांना आरोग्य खाते, राजेंद्र शिंगणे यांना अन्न व औषध प्रशासन खाते , जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण, धनंजय मुंडे यांना समाजकल्याण आणि हसन मुश्रीफ यांना ग्रामविकास खात्याचे जबादारी सोपवण्यात येणार आहे. तर, राज्यमंत्री आदिती तटकरे यांना उद्योग , पर्यटन विभाग देण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवसेना व काँग्रेस मध्ये समसमान खाती वाटून घेण्यात आली आहेत, इथे पहा यादी

दरम्यान काल, शनिवारी रात्री उशिरा ही यादी निश्चित करून राज्यपालांना पाठवण्यात आली होती, आज राज्यपालांनी यावर स्वाक्षरी केल्यावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. व तशी अधिकृत घोषणा देखील होईल.