महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडला. पण अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील खातेवाटप कधी होणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी खातेवाटपासाठी होणाऱ्या विलंबनाचे कारण स्पष्ट केले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मलिक यांनी असे म्हटले आहे की, आम्ही नवे विभाग तयार करत असल्याने त्यासाठी वेळ होत आहे. मात्र सोमवार पर्यंत याबाबत नक्की कळू शकेल.
महाविकास आघाडी मध्ये खातेवाटपावरुन जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घोटामधील काही खासदारांना मंत्री पदाची संधी न दिल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता सोमवारी खातेवाटप होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असून संभाव्य मंत्र्यांना कोणते खाते मिळू शकते याचा अंदाज लावण्यात आला आहे.(Maharashtra Cabinet Portfolio Allocation: अजित पवार यांना 'अर्थ' तर आदित्य ठाकरे यांच्याकडे 'पर्यावरण'? पाहा महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाची संभाव्य यादी!)
ANI Tweet:
Nawab Malik, NCP: The reason for delay is not due to anything else but because we are considering creating new departments, so its taking time. By Monday portfolios will be allocated. #Maharashtra pic.twitter.com/TnlDWU8qBT
— ANI (@ANI) January 4, 2020
काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यात खातेवाटपावरुन खडाजंगी झाल्याचे दिसून आले. तसेच खातेवाटपावरुन निर्णय लवकरच दिला जाणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात काँग्रेसच्या 12 मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामधील चार जणांना वरिष्ठ मंत्री पदासाठी नेमण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विरोधीपक्षांकडून त्यांच्यावर वारंवार टीका करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदरही भाजपच्या काही नेत्यांनी महाविकासआघाडीच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.