महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मंत्रिमंडळ विस्ताराला 30 डिसेंबर रोजी मूहर्त सापडला. महाविकास आघाडीतील 26 आमदारांनी कॅबिनेट तर, 10 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परतु, अद्याप खातेवाटप (Cabinet Portfolio Allocation) झालेले नाही. यातच आज रात्रीपर्यंत महाविकास आघाडीचे खातेवाटप होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंत्रिमंडळाचा विस्तारावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्या नेत्यांना कोणती खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाची संभाव्य यादी समोर आली आहे.

बुधवारी संपूर्ण दिवसभरात 3 बैठकी पार पडल्या असून महाविकास आघाडीत तब्बल 4 तास खलबत सुरुच होती. यातच आज रात्रीपर्यंत खातेवाटप करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, खातेवाटपात कोणत्या नेत्याला कोणती खुर्ची मिळाणार? याची संभाव्य यादी एबीपी माझाने सादर केली आहे. हे देखील वाचा- एकनाथ खडसे BJP ला रामराम ठोकणार? शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्या 'या' गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण

संभाव्य खातेवाटप राष्ट्रवादी

 

अनिल देशमुख- गृह खाते

अजित पवार- अर्थ आणि नियोजन

जयंत पाटील- जलसंपदा

दिलीप वळसे पाटील- कोशल्य विकास आणि कामगार

जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण

नवाब मलिक- अल्पसंख्याक

हसन मुश्रीफ- सहकार

धनंजय मुंडे- सामजिक न्याय

संभाव्य खातेवाटप काँग्रेस

 

बाळासाहेब थोरात- महसूल खाते

अशोक चव्हान- सार्वजनिक बांधकाम

संभाव्य खातेवाटप शिवसेना

 

एकनाथ शिंदे- नगरविकास

सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म

अनिल परब- मुख्यमंत्री कार्यालय

अदित्य ठाकरे- पर्यावरण

उदय सामंत- परिवहन

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विरोधीपक्षांकडून त्यांच्यावर वारंवार टीका करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदरही भाजपच्या काही नेत्यांनी महाविकासआघाडीच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.