Vintage Car Rally (PC - Twitter)

Vintage Car Rally 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज बीकेसी येथे मुंबई फेस्टिवलचा भाग असलेल्या व्हिंटेज कार रॅलीला (Vintage Car Rally) झेंडा दाखवून सुरुवात केली. आज मुंबई फेस्टिवल मध्ये व्हिंटेज कार बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या रॅलीला सहकुटूंब हजेरी लावली होती. या रॅली मध्ये 100 विंटेज कार तसेच विविध मोटार बाईक सहभागी झाल्या होत्या. या फेस्टिवलमधील दुर्मिळ क्लासिक मॉडेल्स पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.

व्हिंटेज कार रॅलीमध्ये रोल्स रॉयस, बेंटली, फोर्ड यासारख्या मोटारींनी भाग घेतला. या रॅलीतील सर्वात जुनी कार अब्बास जसदानवाला यांनी सादर केली. ही कार 1903 चे मॉडेल आहे. या रॅलीत सहभागी बहुतांश गाड्या 1903 ते 1980 या काळातील आहेत. (वाचा -Purvashi Raut Engagement Ceremony: संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे, पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित)

पहा खास फोटोज -

दरम्यान, यावेळी लोकांमध्ये व्हिंटेज मोटारसायकलींची खूपचं क्रेझ दिसली. ही रॅली रीगल सिनेमा, मरीन ड्राईव्ह, बबूलनाथ, पेद्दार रोड, वरळी सीफेस, वांद्रे-वरळी सी लिंक आणि बीकेसी सोफिटेल मार्गे गेली. या रॅलीत मोठ्या प्रमाणात बाईक्सही दिसल्या. विशेष म्हणजे या व्हिंटेज रॅलीमध्ये फियाट सिलेक्ट 1100 कार देखील सामील झाली होती.