Eknath Shinde | (Photo Credit: X)

मुख्यमंत्री एकाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे 'स्वच्छ मुंबई' मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांनी स्वत: पाईप हातात घेऊन धारावी (CM at Dharavi) येथील रस्त्यांवर पाणी शिंपडले आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री धारावी परिसरात दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी स्वच्छ मुंबई मोहिमेचा (Clean Mumbai) शुभारंभ केला. या वेळी स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने (BMC) स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबई मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात संपूर्ण स्‍वच्‍छता (डीप क्लिनिंग) राबवली जाणार आहे. ज्याची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

स्वच्छ मुंबई मोहिमेचा प्रारंभ

मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी धारावी आणि परिसरातील रुग्णालयांनाही भेट दिली. प्रामुख्याने त्यांनी . सायन रूग्णालयात फिरून पाहणी (CM Eknath Shinde visits Sion Hospital) केली. नंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी स्वच्छ मुंबई मोहिमेचा प्रारंभ केला. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील त्या वेळी उपस्थित होते.

सायन रुग्णालयाच्या आयसीयू आणि जनरल वॉर्डाला भेट

स्वच्छता कर्मचारी या वळी रस्त्यावर पाणी मारुन ते धूत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनीही मग पाईप स्वत:च्या हातात घेतला आणि त्यातून येणाऱ्या पाण्याद्वारे रस्ते स्वच्छ करण्याच्या मोहिमेत हातभार लावला. या वेळी त्यांनी मुंबई स्वच्छ आणिसुंदर करण्यावर भर दिला. तसेच, सायन रुग्णालयाच्या आयसीयू आणि जनरल वॉर्डाला भेट दिली. लवकरच 200 ICU आणि एक हजार बेड वाढविण्या याव्यात अशी सूचना करत त्यांनी सोनोग्राफी मशीन, डायलिसिस युनिट वाढवण्याबाबतही भर दिला. शिवाय हे काम येत्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण होईल, अशी ग्वाहीही दिली. (हेही वाचा, मुंबई मनपाच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा CM Eknath Shinde यांच्या हस्ते शुभारंभ)

व्हिडिओ

धारावी येथील विभाग शनिवार आणि रविवारी आठवड्यातून किमान दोनदा साफ करण्याचा आपला प्रयत्न आहे. रस्त्यावर शेकडो माणसे काम करत असतात. पण तेवढ्यांवर थांबून चालणार नाही. चार पाच वॉर्डनी एकत्र येत या सर्वांवर काम करणे आवश्यक आहे. त्यावरील माती साफ करणे, धूळ हटविणे आणि गटर सफाई करण्याचे काम सुरु असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

विधानसभा आणि लोकसभा तोंडावर आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही लवकरच लागू शकतात. अशा वेळी सर्वच राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्षही पाठीमागे नाही. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने जनसंपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.