CM Eknath Shinde: शिवसेना म्हणून राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रीया
CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

मुंबईतील (Mumbai) मराठी माणसाबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा खळबळजनक विधान केलं होतं. गुजराती (Gujrati) आणि राजस्थानी (Rajasthani) निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी (Economical Capital) राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य भगसिंह कोश्यारी यांनी केलं होत. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांसह राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे.  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), मनसे प्रवक्ते संदिप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) संबंधीत वक्तव्यावर राज्यपालांवर हल्लाबोल  केला आहे.  राज्यपालांच्या भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. तरी राज्याच्या राजकारणात याचे कसे पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

 

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं ते वैयक्तीक विधान आहे, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारु शकत नाही. मराठी माणसामुळेचं मुंबईला वैभव आणि नावलौकीक प्राप्त झालेलं आहे. राज्यपाल हे राज्यातील एक प्रतिष्ठीत पद आहे त्यामुळे कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. मुंबईच्या योगदानात कुणाला मराठी माणसाची अवहेलना करता येणार नाही. केवळ मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई देशाची आर्थिक राजधानी झालेली आहे. (हे ही वाचा:- BS Koshyari Controversial Statement: 'मराठी माणसाला डिवचू नका!' Raj Thackeray यांचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारींवर हल्लाबोल)

 

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुंबईने अनेक संकट पाहिली आहे, कितीही संकट आली तरी मुंबई कुणासाठीही थांबत नाही आणि २४ तास सुरु असते. कोट्यावाधी लोकांना एकटी मुंबई रोजगार देते. त्यामुळे मुंबईचा किंवा मराठी माणसाच्या विरुध्द कुठल्याही विधानाशी शिवसेना सहमत नाही कारण आम्हाला ते मान्य नाही. मुंबईबाबत आणि मराठी माणसाबाबत जी बाळासाहेब ठाकरेंची भुमिका होती तिचं भुमिका कायम आमची असणार आहे.