सिडको घरे (CIDCO House) खरेदी, विक्री आणि लॉटरी (CIDCO Lottery) याबाबत एक महत्त्वाचे वृत्त आहे. महामंडळाने नुकताच याबाबत एक महत्त्वपूर्णन निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आता महामंडळ निर्मीत घरांच्या विक्रीसाठी महामंडळाच्या एनओसीची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय इतर व्यक्तीस घर विक्री करत असताना द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा मोठा निर्णय महामंडळाद्वारे (CIDCO Corporation) घेण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, सीडको लॉटरी येत्या 7 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती, सिडको महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाचा नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर येथील मिळून सुमारे सुमारे सव्वालाख लोकांना होणार आहे. मात्र, त्यामुळे सिडकोच्या महसूलावर परिणाम होऊ शकेल.
सिडको घर स्वत:च्या मालकीचे
सिडको महामंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे आता सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर लीजवर न राहता ते सदर व्यक्तीच्या मालकीचे होणार आहे. या निर्णयाच्या आधी ही घरे विकण्यासाठी सीडको महामंडळाची एनओसी घ्यावी लागत असे. याशिवाय ही घरे विक्री करत असताना निश्चित शुल्कही भरावे लागत असे. नव्या निर्णयाने हा नियम रद्द करण्यात आल्याने असंख्य सीडको गृहधारकांना त्याचा फायदा होणार आहे. शिवाय घरेही विनात्रास विकता येणार आहेत. (हेही वाचा, Cidco News : सिडकोच्या अडचणी आणखी वाढल्या; घरांच्या किमती कमी करूनही अपेक्षित प्रतिसाद नाहीच)
शुल्कापोटी पैसे द्यावे लागणार नाहीत
सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी माहिती देताना सांगितले की, पाठिमागील अनेक दिवसांपासून महामंडळाच्या घरांवरील लिज होल्ड करा अशी मागणी होत होती. त्यामुळे महामंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. या चर्चेमध्ये ही घरं फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिर्णयासोबत आणखीही एक महत्त्वाचा निर्णय झाला. ज्यामुळे घर विकताना शुल्कापोटी जे पैसे द्यावे लागत, ते पैसेही द्यावे लागणार नाहीत. मात्र, हा नियम/निर्णय 100 मीटरच्या खालती असणाऱ्या घरांना लागू असेल. सिडको घरे 100 मीटरच्या वरती असतील त्यांना मात्र नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयामुळे सिडकोचे घरही आता सामान्य जनतेच्या हक्काचे होईल, आगामी बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाईल. सिडको लॉटरी बाबतही त्यांनी भाष्य केले. (हेही वाचा, CIDCO Lottery 2024: नागरिकांसाठी आनंदाची बातमी! सिडकोकडून विक्रीसाठी 900 हून अधिक फ्लॅट्सची ऑनलाइन नोंदणी सुरू)
दरम्यान, नवी मुंबई येथील सिडकोच्या घरांसाठी येत्या सोमवारी (7 ऑक्टोबर) लॉटरी काढली जाणार आहे. ही लॉटरी 2 ते 5 ऑक्टोबरदरम्यान काढली जाणार होती. मात्र, आगोदर देण्यात आलेल्या तारखेत बदल करुन आता नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही लॉटरी सिडकोनं बांधलेल्या 26 हजार सदनिकांसाठी निघणार आहे. ज्याद्वारे अनेकांचे नवीमुंबई परिसरात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.