Cidco Lottery 2022: तुम्ही जर नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात घर घेऊ इच्छित असाल आणि म्हाडा लॉटरी (MHADA Lottery) मध्ये तुम्हाला घर लागलं नाही तर काळजी करु नका. गुढी पाढव्याच्या शुभ मुहूर्तावर सिडको (CIDCO) आपल्या लोकप्रिय गृहनिर्माण योजना जाहीर करत आहे. या योजनेमध्ये विविध भूखंड, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिका आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्री यांबाबत तपशील जाहीर करण्या येणार आहे. प्रामुख्याने या योजनेत नवी मुंबईच्या विविध नोडमधील वाणिज्यिक गाळे तसेच निवासी, वाणिज्यिक आणि सामाजिक उद्देशांसाठी भूखंड ई-लिलाव तथा ई-निविदा प्रक्रियेद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल.
सिडको योजना नवी मुंबईतील कोणकोणत्या नोड्समध्ये?
- खारघर
- घणसोली
- कळंबोली
- तळोजा
- द्रोणागिरी
काय असे योजनेत?
- मोक्याच्या ठिकाणी वाणिज्यिक गाळे. ज्याद्वारे व्यावसायिकांना व्यवसाय सरु करता येईल. असलेला व्यवसाय वृद्धिंगतही करता येईल.
- लहान व मोठ्या आकाराचे निवासी आणि वाणिज्यिक भूखंड. ज्यामुळे विकासकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मिळेल आपले हक्काचे घर.
- विविध सामाजिक उद्देशांकरिता मोठ्या प्रमाणावर भूखंड उपलब्ध
सिडको गाळे, भूखंड विक्री कशी पडेल पार?
- ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे पारदर्शक विक्री.
- लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी https://cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आवश्यक माहिती कुठे मिळेल?
सिडकोने उपलब्ध करुन दिलेल्या https://cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी, अनामत रक्कम व शुल्क भरणा, निविदा सादर करणे, लिलाव या प्रक्रियेची सर्व माहिती दिली जाईल. शिवाय अधिकृत समाज माध्यम (सोशल मीडिया) यांवरही या माहितीबाबत सांगितले जाईल. (हेही वाचा, खुशखबर! CIDCO कडून होळीची भेट; नवी मुंबईमध्ये 6,508 घरे विक्रीसाठी उपलब्ध, 'या' तारखेपर्यंत करू शकता अर्ज )
सिडकोच्या विविध योजनांबाबत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. शिंदे यांनी म्हटले की, समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सिडको नेहमीच पुढाकार घेते. सिडकोच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगिण विकासावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करुनच आराखडा बनविण्यात आला आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही शिंदे म्हणाले.