CIDCO Lottery 2019 Date: सिडको घरांची लॉटरी निकाल 26 नोव्हेंबरला; अर्ज करण्यासाठी 5 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
CIDCO | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Twitter)

CIDCO Lottery 2019 Draw Date: सिडको कडून 'प्रधानमंत्री आवास योजना' अंतर्गत पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या सोडतीच्या रजिस्ट्रेशनला सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता 5 ऑक्टोबर 2019 पर्यंत नागरिक अर्ज सादर करू शकणार आहेत. तर 26 नोव्हेंबर 2019 दिवशी सिडकोच्या या घरांसाठी लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सिडकोकडून नवी मुंबईत 11 सप्टेंबर 2019 दिवशी सुमारे 9249 घरांसाठी रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. सिडको नवी मुंबईमध्ये 2.10 लाख घरं सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojna) उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत आणि सोडतीच्या निकालामध्ये मुदतवाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. CIDCO Lottery 2019 Registration: नवी मुंबई मध्ये 'सिडको' च्या 9249 घरांसाठी नोंदणीला होणार सुरूवात; lottery.cidcoindia.com वर अर्ज उपलब्ध

नवी मुंबईमध्ये पावणे, तुर्भे, बोनसरी, शिरवणे आणि कुकशेत या एमआयडीसी भागांमध्ये सिडको आता नवी घरं बांधणार आहेत. सध्या सिडकोने दिलेल्या जाहिरातीतील 1 लाख 10 हजार घरांपैकी 62,976 घरं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांसाठी तर 47,040 घरं अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबईतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील प्रत्येकाला हक्काचं घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत देशात 20 मिलियन घरं सामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

नवी मुंबईमधील या सोडतीमधील घरांच्या किंमती 18 ते 28 लाख आहेत. सिडको गृहनिर्माण योजना बुकलेट येथे पहा आणि या सिडको लॉटरीच्या घरांचा नकाशा, विभागानुसार घरांच्या किंमती, घरांचे लोकेशन आणि पेमेंट बाबतचे अधिक तपशील पाहू शकता. सिडकोकडून ही घरं रेल्वे स्टेशन बाहेरील भूखंड, ट्रॅक टर्मिनल आणि इतर ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. सिडकोची ही योजना अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मोठी योजना असल्याचे सांगितलं जात आहे.