CIDCO Lottery 2019 Registration: नवी मुंबई मध्ये 'सिडको' च्या 9249 घरांसाठी नोंदणीला होणार सुरूवात; lottery.cidcoindia.com वर अर्ज उपलब्ध
CIDCO Houses and commercial plots | representational purpose (Photo Credits: Instagram )

Cidco Lottery 2019 Online Registration:  मुंबई, नवी मुंबई शहरांचा झपाट्याने होत असलेला विकास आणि देशभरातून या मायानगरीमध्ये येणारे लोंढे यांच्यामुळे शहरावर ताण येतो. अशातच गगनाला भिडणारे घरांचे दर यांच्यामुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारे मुंबई, नवी मुंबईमधील घर खरेदीचे स्वप्न आता पुन्हा त्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी म्हाडा, सिडको सारखे प्रकल्प अनेकांसाठी आशेचा किरण आहे. सिडको लॉटरी 2019 (Cidco Lottery 2019) च्या अंतर्गत,  11 सप्टेंबरपासून  नवी मुंबईमध्ये सुमारे 9 हजारांहून अधिक घरांसाठी नोंदणीला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या नोंदणी कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. सिडकोच्या घरांसाठी नोंदणी करण्यासाठी lottery.cidcoindia.com वर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  सिडको गृहनिर्माण योजना जाहिरात  इथे सविस्तर पहा.

नवी मुंबईमध्ये सिडको कडून सुमारे 95,000 हजार घरं बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 9249 घरांसाठी नोंदणी आजपासून सुरू होत आहे. पुढे टप्प्याटप्प्याने त्यांच्या नोंदणीमध्ये वाढ होणार आहे. सिडकोकडून ही घरं रेल्वे स्टेशन बाहेरील भूखंड, ट्रॅक टर्मिनल आणि इतर ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. सिडकोची ही योजना अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मोठी योजना असल्याचे सांगितलं जात आहे. तळोजा मेट्रो डेपोमध्ये 11 सप्टेंबरच्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून नोंदणी प्रक्रियेला शुभारंभ झाला आहे. तळोजा येथील मेट्रो डेपोमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामधील घरांच्या किंमती 18 ते 28 लाख आहेत.  सिडको गृहनिर्माण योजना बुकलेट  मध्ये  पहा आणि या सिडको लॉटरीच्या घरांचा नकाशा, विभागानुसार घरांच्या किंमती, घरांचे लोकेशन आणि पेमेंट बाबतचे अधिक तपशील.  सिडकोच्या घरधारकांना दिलासा, घरं आणि कमर्शिअल प्रॉपर्टी Lease Hold ऐवजी Free Hold करण्याचा निर्णय

नवी मुंबईमध्ये नुकत्याच आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठीदेखील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईमध्ये काही घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने खारघर, सानपाडा अशा भागांमध्ये घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.