CIDCO Houses and commercial plots | representational purpose (Photo Credits: Instagram )

औरंगाबाद(Aurangabad) , नाशिक (Nashik) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) सह महाराष्ट्रभरातील सिडको (CIDCO) घरधारकांना आणि कमर्शिअल प्रॉपर्टी धारकांना  आज राज्य सरकारने मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सिडकोची घरं आणि कमर्शिअल प्रॉपर्टी लीज (lease hold) ऐवजी फ्री होल्ड (free hold) करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता घराची संपूर्ण मालकी घर धारकाला मिळणार आहे.महिन्याभरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे असे कडून सांग़ण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले हे महत्वाचे 13 निर्णय

सिडकोकडून खरेदी करण्यात आलेली जमीनदेखील आता मालमत्ताधारकांची असेल. यापूर्वी सिडकोच्या नावावर जमीन आणि केवळ इमारत घर मालकाची होती. 90-99 वर्षांच्या करार तत्त्वावर लोकं सिडकोसोबत व्यवहार करत होते.  आता राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे संपूर्ण मालकी ही मलमत्ता धारकांची असेल. यापूर्वी मालकाने सिडकोसोबत करार केला असला तरीही खरेदी विक्रीच्या दरम्यान मालकी कायम सिडकोकडेच राहत असे. सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय व्यवहार करणं शक्य नव्हतं.

सिडको आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांसाठी घरं बांधते. यामध्ये उच्च, मध्यम आणि अल्प घटकासाठी घरं बांधते.