Cidco | (File Image)

सर्वसामान्यांच्या आवाक्यात त्यांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई मध्ये सिडको कडून विविध प्रोजेक्ट्स (CIDCO Housing Lottery) सुरू आहेत. दरम्यान त्यापैकी 4158 घरांसाठी तसेच 245 गाळे, 6 कार्यालयांसाठी काल गणेश चतुर्थीला सुरूवात झाली आहे. यासाठी अर्ज स्वीकारण्यास आज 1 सप्टेंबर पासून सुरूवात झाली आहे. दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवी मुंबई मध्ये ही घरं उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सिडको कडून सोडतीसाठी नवी मुंबईत द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघरमध्ये घर दिले जाणार आहे. परवडणाऱ्या दरातील या 4158 घरांपैकी 404 घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता राखीव आहेत तर उरलेली 3754 घरं ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज कधी कराल - 1 सप्टेंबरपासून 4 ऑक्टोबर 2022

नोंदणी आणि अर्जात बदल - 1 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन पेमेंट - 1 सप्टेंबरपासून 7 ऑक्टोबर 2022

(हे देखील नक्की वाचा: MHADA Lottery च्या प्रक्रियेमध्ये बदल; अर्ज भरतानाच करावी लागणार कागदपत्रांची सारी पूर्तता).

दरम्यान सोडत 19 ऑक्टोबर 2022 दिवशी जाहीर होण्याचा अंदाज आहे. अर्ज नोंदणीपासून ते सोडतीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पार पडणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे.