चीनच्या विदेश मंत्रालयाने अमेरिकेच्या संसदेतील अध्यक्षा नैन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्यावर प्रतिबंध (Sanctions) लावण्याची घोषणा केली आहे. चीनच्या विरोधानंतरही नैन्सी पोलोसी यांनी तैवानचा दौरा केल्याने हे प्रतिबंध लादण्यात आल्याचे समजते. नन्सी पोलोसी यांनी नुकताच तैवान दौरा (Taiwan Visit) केला. त्यानंतर अल्पावधीतच चीनी परराष्ट्र मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. चीनने आरोप केला आहे की, नैन्सी पोलोसी यांनी तौवान दौरा करुन तेथील नागरिकांच्या भावना दुखावल्या व भडकवाल्यासुद्धा. त्यांनी चीन आणि तैवान यांच्यातील अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप केला आहे.
चीनने पाठिमागील काही वर्षांध्ये अमेरिकेच्या इतरही अनेक अधिकाऱ्यांवर कथीतर रित्या प्रतिबंद लावण्यात आले आहेत. हे प्रतिबंध नेमके कोणत्या कारणामुळे लावण्यात आले आहेत याबाबत मात्र चीनने मौन बाळगले आहे. मार्च महिन्यात चीनने म्हटले होते की, तो अमेरिकी अधिकाऱ्यांवर विजा प्रतिबंद लावत आहे. जो कथित रुपात चिनमधील मानवाधिकार मुद्द्यांवर बोलत आहे. चीनने प्रतिबंध लावलेल्या अधिकाऱ्यांची यादी सार्वजनिक केली नाही. (हेही वाचा, Nancy Pelosi Taiwan Visit: चीनच्या नाकावर टिच्चून अमेरिकेने दिला तैवानला पाठींबा; नॅन्सी पेलोसी यांची भेट ड्रॅगनसाठी ठरली डोकेदुखी)
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो आणि माजी अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी सल्लागार पीटर नवरो यांच्यावरही चिनने प्रतिबंध लादले आहेत. या लोकांवर चीनमध्ये प्रवेश करणे आणि चीनी संस्थांसोबत व्यापार करण्यावर प्रतिबंध होते. चीन तैवानला आपला हिस्सा मानतो. चीनचे म्हणने असे की, तैवानला एक दिवस पूर्णच कब्जात घ्यावे लागेल. मग ते बळाचा वापर करुन का असेना.