Manipuri Children Rescued from Maharashtra School: नाशिकच्या शाळेतून मणिपूरमधील पाच मुलांची सुटका; अत्याचाराचा आरोप, एकास एअर गनने दुखापत
Schools | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Maharashtra, Manipur Children Tortured: नाशिक (Nashik) येथील एका शाळेतून मणिपूर राज्यातील पाच विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार आणि त्यांचा छळ झाल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, त्यातील एका मुलाला एअर गणची दुखापत झाल्याचेही सांगितले जा आहे. मोफत शिक्षण देण्याचे आमिष दाखवून या मुलांना महाराष्ट्रात आणण्यात आले होते. नव्याने सुरु करण्यात आलेल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश दिला होता. याच शाळेच्या सदस्यांनी त्यांच्यावर अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुलांच्या पालकांना याबातब माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या पालकांनी मणिपूर सरकारच्या समाज कल्याण विभागास माहिती दिली आणि कारवाई करण्याची मागणी केल्याचे समजते.

दरम्यान, सदर प्रकरणाबाबत इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूरच्या समाजकल्याण विभागाचे संचालक एन उत्तम सिंग यांनी सदर घटनेस दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुलांवर झालेल्या अत्याचाराबाबत अहवाल मागविण्यात आला आहे. त्यांच्यावरील अन्यायाचे निराकरण करण्यात येईल. मणिपूर सरकारने महाराष्ट्रातील समाज कल्याण आयुक्तांशी संपर्क साधून पीडित पाच मुलांची सुटका आणि तत्सम प्रकरणांची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा, Manipur Violence: मणिपूर विद्यार्थी हत्येप्रकरणी चौघांना अटक, आरोपी CBI कडे हस्तांतरीत)

मणिपूर सरकारच्या निर्देशांनंतर, नाशिकमधील जिल्हा बाल संरक्षण युनिट (DCPU) च्या अधिकाऱ्यांनी त्वरीत हस्तक्षेप करून 3 फेब्रुवारी रोजी मुलांची सुटका केली. दरम्यान, या मुलांची वेळीच सुटका करण्यात आल्यामुळे पीडितांपैकी एका मुलास झालेल्या एअर गनच्या दुखपातीबाबतही धक्कादायक माहिती पुढे आली. (हेही वाचा, Congress Bharat Jodo Nyay Yatra: मणिपूरमधून सुरू होणार काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा'; सरकारने 'या' अटींसह दिली परवानगी)

दरम्यान, मुलांच्या छळाबाबत माहिती पुढे येताच या प्रकरणाचा सखोल तपासकरण्याच्या उद्देशाने श्री स्वामी नारायण इंग्लिश मीडियम स्कूलची त्वरित तपासणी सुरू करण्यात आली, असे मणिपूरच्या समाजकल्याण विभागाचे संचालक एन उत्तम सिंग यांनी सांगितले. तसेच, सुटका करण्यात आलेल्या मुलांना 8 फेब्रुवारी रोजी मणिपूर समाज कल्याण विभागाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील अनेक शाळा विद्यमान स्थितीमध्ये पटसंख्येचा सामना करत आहेत. अनेक शाळांमध्ये पटसंख्या पुरेशी नसल्याने त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी या शाळेतील शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेची पटसंख्या टिकविण्यासाठी अनेक संस्था गाव, तालुका, जिल्हा कधी कधी राज्याबाहेरुनही विद्यार्थी आणत असतात. त्यांच्या राहण्याची खाण्याची आणि मोफत शिक्षणाची सोय केली जाईल, असेही या शाळा सांगत असतात. दरम्यान, अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा छळ होणे चिंतेची बाब मानली जात आहे.