Chikku Dispute | (Photo credit: archived, edited, representative image)

किरकोळ कारणावरुन वाद (Dispute) आणि त्या वादाचे पर्यावसन पुढे मोठ्या भांडणात किंवा दोन गटांतील हाणामारीत झाल्याची उदाहणे यापूर्वीही घडली आहेत. अशी घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात घडली आहे. फळविक्रेत्याकडचे चिक्कू (Chikku) एका ग्राहकाने दाबले आणि ते ते फुटले. केवळ एवढ्या कारणावरुन दोन गटामध्ये एवढा मोठा राडा झाला की, चक्क अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली. इतकेच नव्हे तर, या वेळी झालेल्या हाणामारीत चक्क पाच ते सात जण जखमी झाले आहे. पैठण (Paithan) तालुक्यातील बिडकीन गावात रविवारी (7 जानेवारी) हा विचित्र प्रकार घडला. बिडकीण पोलीस दप्तरी या प्रकरणात दोन्ही गाटातील एकूण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अर्थात या जिल्ह्यात असा काही प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. सन 2028 मध्येही या जिल्ह्यात केवळ अंबे विकत घेण्यावरुन वाद झाला होता. ज्यावरुन चक्क दंगल पेटली होती.

चिक्कू दाबताना फुटला अन् वाद सुरु झाला

प्राप्त माहितीनुसार, रईस शेख बाबू (वय 33 वर्षे, व्यवसाय फळविक्रेता रा. बागवान गल्ली बिडकीन ता. पैठण जि. छ. संभाजीनगर) नामक व्यक्तीने बिडकीन पोलिसांमध्ये तक्रारी दिली आहे. या तक्रारीनुसार, फिर्यादीचा फळविक्रीचा गाडा आहे. जो बिडकीन बस स्टँड परिसरात आहे. घटना घडली तेव्हा फिर्यादीचा भाचा गाड्यावर होता. या वेळी कृष्णा वाघ नावाचा एक ग्राहक फळ खरेदीसाठी आला. त्यांनी गाड्यावरील चिक्कू दाबून पाहण्यास सुरुवात केली. या वेळी एक चिक्कू दाबल्याने फूटला. गाड्यावरील मुलाने म्हणजेच फिर्यादीच्या भाच्याने चिक्कू फोडू नका असे कथितरित्या ग्राहकाला सांगितले. यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. शाब्दिक बाचाबाची हाणामरीपर्यंत पोहोचली. यामध्ये फळविक्रेता मुलगा जखमीही झाला. ज्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. (हेही वाचा, Summer Health Tips: उन्हाळ्यात चिकू खाण्याचे 'हे आश्चर्यजनक फायदे तुम्हाला माहित आहे का?)

एकावर वस्ताऱ्याने वार

रईस शेख आपल्या भाच्याला रुग्णालयात घेऊन जात असताना तिथे आणखी काही लोकांचा जमाव जमला आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. दोन्ही गटामध्ये जोरदार वाद सुरु झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरु झाली. या झटापटीत एकाने सलूनच्या दुकानातून वस्तारा आणला आणि तो मारल्याने एकजण जखमी झाला. या सर्व प्रकारात पाच ते सजा जण जखमी झाले. तोवर या राड्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छत्रपती संभाजी नगर शहरातील वातावरणाची कल्पना असल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावली आणि जमावाला पांगवले. (हेही वाचा, ऐकावं ते नवलच! एकाच झाडाला 40 प्रकारची फळं, किंमत फक्त 19 लाख रुपये)

घटनेची जिल्हाभर चर्चा

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून जवळपास 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन घडलेल्या या मोठ्या भांडणाची जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.