
केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार, उद्धव ठाकरे उद्या (रविवार, 26 सप्टेंबर) दिल्लीच्या दौऱ्यावर (Delhi Tour) जाणार असून अमित शाह यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यासह अनेक विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी विमानाने दिल्लीला जाणार आहेत. तसेच उद्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता आहे. या संदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Reopen Theaters In Maharashtra: महाराष्ट्रात 22 ऑक्टोंबरपर्यंत चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे करणार खुली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआही दिल्लीचा दौरा केला होता. त्यावेळी त्यानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात बंददाराआड बैठक झाली होती. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना- भाजप युतीची चर्चा रंगली होती. महत्वाचे म्हणजे, उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात नेमके कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आली आहे.