Maharashtra: पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील डॉक्टरांना महत्वाचे आवाहन
CM Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक ठिकाणी मोसमी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात काही रोग व साथीरे आजार डोके वर काढतात. महत्वाचे म्हणजे, 'कोविडची लक्षणे फसवी आहेत. साथीचे आजार आणि कोरोना यांच्यातील काही लक्षणे एकसारखीच आहेत. यामुळे डॉक्टरांनी रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील डॉक्टरांना केले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नुकतेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदने आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील 2 दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, "आपण 'माझा डॉक्टर' या संकल्पनेतून सातत्याने राज्यभरातील डॉक्टर्सशी संवाद साधत आहोत. महत्वाचे म्हणजे, सर्वसामान्यांना कोणताही त्रास झाला की ते आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतात. यामुळे डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. कोरोनाची लक्षणे फसवी आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत नाही. अशा वेळी रुग्णास ओळखण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आहे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे त्याकडेही डॉक्टर्सनी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे' असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Pune: शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांचे लसीकरण कधी? महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली महत्वाची माहिती

तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने, रुग्णालये बंद ठेवली होती. त्यावेळी प्रत्येकामध्ये कोरोनाची भिती असून राज्याकडे मास्क, पीपीई कीट तसेच इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा देखील मोठ्या प्रमाणवर तुटवडा होता. परंतु, आता या दुसऱ्या लाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स, जनरल फिजिशियन, विविध रोग तज्ञ, मैदानात उतरले आहेत' असे बोलत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

राज्यात आज 20295 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 31964 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 5339838 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 276573 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.