महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून अनेक योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलनातील (Bandra Kurla Complex) एमएमआरडी येथे कोविड19 चे रुग्णालय (COVID19 Hospital) उभारणीचे काम जोरात सुरु आहे. याच रुग्णालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात जवळजवळ तत्काळ 1 हजार कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाबाधित रुग्णांपैकी निम्म्यांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबई शहरात सापडले आहेत. मुंबई कोरोना विषाणूचा अधिक प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील वानखेडे मैदान ताब्यात देण्याची विनंती एमसीएकडे केली होती. मात्र, मान्सून तोंडावर आहे. त्यामुळे वानखेडे मैदान क्वारंटाइन केंद्रासाठी योग्य नाही, अशी माहिती पालिका आयुक्तांनी आज दिली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.