महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार
Chief Minister Uddhav Thackeray's (PC - Twitter)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज रात्री 8. 30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा घोषीत करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय संदेश देणार आहेत? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात आजपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. येत्या 31 मेपर्यंत लॉकडाउनचा काळ संपणार आहे. मात्र, कोरोना विषाणूची स्थिती पाहता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? त्याबाबतही काही संकेत देणार का? हे आजच्या फेसबूक लाईव्हमध्ये समजणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासह 9 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे यांना शपथ दिली. उद्धव ठाकरेंची विधिमंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून राज्यावर घोंगावणारे राजकीय संकट दूर झाले आहे. यानंतर आज उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद सांधणार आहेत. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ; पुढील 6 वर्ष राहणार आमदार

ट्वीट-

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत 33 हजार 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 हजार 688 जण कोरोनामुक्त झाले आहेत.