Milind Narvekar: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी
Milind Narvekar | (File Image)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना (Shiv Sena) सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar ) यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणी मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबई पोलिसां गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपद्वारे धमकी मिळाली. धमकीमध्ये आपल्या मागण्या पूर्ण करा अन्यथा तुमच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी लावू असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहाय्यकासच धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, मिलिंद नार्वेकर यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद नार्वेकर यांच्याकडे तक्रार दिली आहे. मिलींद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासून सहकारी म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या वतीने पडद्यामागून सूत्र हालविण्यात नार्वेकर अतिशय निष्णात असल्याचे बोलले जाते. शाखाप्रमुख व्हायचं स्वप्न बाळगून असलेला शिवसेना गटप्रमुख ते उद्धव ठाकरे यांचा स्वीय सहाय्यक आणि आता शिवसेना सचिव असा नार्वेकर यांचा प्रवास आहे. मुंबई प्रीमियर लीग गव्हर्निंग कौन्सील अध्यक्ष म्हणूनही नार्वेकर हे पाठिमागील वर्षापासून कार्यरत आहेत. (हेही वाचा, Tejas Thackeray ची तुलना क्रिकेटपटू Vivian Richards सोबत करत मिलिंद नार्वेकर यांच्या कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'सामना' तील जाहिरातीची राजकीय वर्तुळात चर्चा)

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपामुळे मिलिंद नार्वेकर जोरदार चर्चेत आले होते. कोणतीही परवानगी न घेता नार्वेकर यांनी दापोली येथील समुद्र किनारी बंगला बांधला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी आरोप करत म्हटले होते की, दापोलीतील मुरुड गावच्या समुद्र किनाऱ्यावर घेतलेल्या 78 गुंठा जागेवर नार्वेकर यांनी बेकायदेशिरपणे दुमजली बंगला बांधण्याचे काम सुरु केले आहे. हा बंगला बांधताना मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले आहे. याशिवा झाडांचीही मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.