अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याच्या वाढदिवसानिमित्त मालाड येथे पोस्टर (Chhota Rajan Birthday Poster) झळकवणाऱ्या सहा जणांविरुद्ध मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे ज्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात एका अशा व्यक्तीचा समावेश आहे. जो कबड्डी सामन्यांचा (Kabaddi Matches) आयोजक आहे. त्यामुळे छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी सामनेही आयोजिक करण्यात आलेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
अधिक अशी की, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाडमध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे या स्पर्धेचे बॅनरही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. कबड्डीचा सामना मालाडच्या तानाजी नगर येथील कुरार व्हिलेज गणेश मैदानावर होणार आहे. या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही कबड्डी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी सायंकाळी 6.00 वाजता होणार आहे. हा बॅनर सीआर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी लावला आहे. (हेही वाचा, Chhota Rajan Extortion Case: विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो न्यायालयाने छोटा राजनला 2002 च्या खंडणी प्रकरणातून केले मुक्त)
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार आरोपींची गेल्या नोव्हेंबर (2022) मध्ये मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दुहेरी हत्याकांडातून निर्दोष मुक्तता केली होती. छोटा शकील टोळीतील आसिफ दधी उर्फ छोटे मियाँ आणि शकील मोडक यांची 2010 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या दुहेरी हत्याकांडात छोटा राजनवर कट रचल्याचा आरोप होता.
ट्विट
Maharashtra | Mumbai Police books six people who put up a poster wishing underworld don Chhota Rajan on his birthday, in Malad. The six people who have been booked, also include a man who had organised a Kabaddi event on the occasion. pic.twitter.com/uI62rwLrAd
— ANI (@ANI) January 14, 2023
दरम्यान, मोहम्मद अली जान, प्रणय राणे आणि उमेदी यांनाही या खटल्यात आरोपी करण्यात आले होते. मात्र सरकारी यंत्रणा गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरली. तपासात पुराव्याअभावी, ओळख परेडमध्ये अपयश, वापरलेली हत्यारे आणि गोळ्या जुळत नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे आरोपी 12 वर्षे तुरुंगात होते.