Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये मद्यधुंद डॉक्टर रुग्णालयातच झाला निर्वस्त्र, व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयातून (Government Hospital) एक धक्कादायक समोर आलाय. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टरने निर्वस्त्र होऊन नग्न अवस्थेत रुग्णालयात फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. धक्कादायक म्हणजे अंगावर एकही कपडा नसलेला हा डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा डॉक्टर औषधांचा नशा करतो आणि नशेत असतांना त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.   (हेही वाचा - Molestation-Rape Cases in Mumbai: मुंबईत जानेवारीमध्ये दररोज विनयभंगाच्या 6 घटना, तर बलात्काराची एक घटना- Official Data)

गेल्या दोन- तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा असल्याचा दावा केला जात आहे.  विशेष म्हणजे या डॉक्टराचे नग्न अवस्थेत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून बिडकीन शासकीय रुग्णालय चर्चेत आहे. या रुग्णालयात डॉक्टरांकडून वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप अनेकदा झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना पास देण्यात येणार आहेत. हे पास दाखविल्यानंतरच त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळणार आहे. घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची माेठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही गर्दी कमी करण्यासाठी घाटी प्रशासनाने पुन्हा एकदा पास देण्याची यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतलाय.