Aaditya Thackeray: शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहे पावसाअभावी मराठवाड्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे, अनेक भागात शेतकऱ्यांची पीकं वाया गेली आहेत. दुष्काळग्रस्त भागात आज आदित्य ठाकरे पाहणी करणार आहे. गेल्या महिन्यात पावसाने दडी मारल्याने काही भागात पीकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. आज आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यात शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
यावेळी ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली आहे.बळीराजा वर भरपूर मोठं संकंट आल आहे. भरपूर प्रमाणात पीकांचे नुकसान झाले. पावसाअभावी नदी नाले कोरडे पडल्यानी शेतकऱ्यांवर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर
निपाणा तालुक्यात सकाळई ११.३० वाजता पाहणी, पैठण तालुक्यातील लोहगांव येथे दुपारी 12.45 वाजता पाहणी दौरा,गंगापुर तालुक्यातील गुरुधानोरा येथे दुपारी 1.30 वाजता पाहणी दौरा, वैजापूर मतदार संघातील मुद्देशवाडगांव येथील शेतकऱ्यांसमवेत दुपारी 2.30 वाजता संवाद साधणार.
जिल्ह्यातील हलक्या स्वरुपात पाऊस झालेला असला तरीही ऑगस्ट एक महिना पावसाने पाठ फिरवली होती. या काळामध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतू, शासनाने या नुकसानीची अग्रीम भरपाई देण्याचे आश्वासन दिले असले तरीही मदत पोहोचलेली नाही. याच दरम्यान उद्या देखील नाशिक दौऱ्य़ावर असणार अशी माहिती शिवसेनेकडून मिळाली आहे. नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील भेंडाळी गावातील नुकसानग्रस्त भागाची 11.30 वाजता पाहणी, सिन्नर तालुक्यातील वंडागळी 12.30 वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी, इगतपुरी तालुक्यातील साकुर गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि शेतकरी संवाद