छत्रपती संभाजी संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील सीटी चौक परिसरात घडलेल्या घटनेने शहर हादरून गेले आहे. येथील सराफा दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाचे एका टोळक्याने अपहरण (Kidnapping) केले. या तरुणाचे अपहरण (Chhatrapati Sambhaji Nagar Kidnapping) होत असतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती वेळीच मिळाले आणि तपासाचू सूत्रे वेगाने फिरवल्याने या तरुणाची सुटका करण्यास जिल्हा पोलीसांना यश आले आहे. तरुण सुखरुप बचावला असला तरी, या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मोबाईल फोन पडला आणि आरोपींचा छडा लागला
शहरातील सीटी चौक परिसरात घडलेल्या या थरारक अपहणाबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावली असता त्यांना एक पडलेला मोबाईल आढळला. हा फोन अपहरणकर्त्या टोळक्यापैकीच एकाचा असावा असा दाट संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच फोनवरुन संपर्क साधला असता थेट आरोपींचे लोकेशनच मिळाले. त्यानंतर पोलिसांनी आरपींचा छडा लावत तरुणाची सुटका केली. (हेही वाचा, Honour Killing In Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगर मध्ये 17 वर्षीय बहिणीला चुलत भावानेच 200 फूटांवरून ढकललं; प्रेमप्रकरणातून हत्या)
काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असणआऱ्या दावरवाडी येथील एका तरुणास सोन्याचे दागिने खरेदी करायचे होते. त्यासाठी त्याने जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या शहरातील सराफा दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीस सुमारे 8 लाख रुपये कथीतरित्या दिले होते. अनेक दिवस उलटून गेले तरी, सदर व्यक्तीने मात्र या तरुणास दागिने दिलेच नाहीत. त्यामुळे कातावलेल्या तरुणाने या व्यक्तीस सातत्याने फोन करुन संपर्क साधण्यास सुरुवात केली. असे असले तरी, सदर व्यक्ती कोणताही प्रतिसाद देत नव्हता. हा व्यक्ती ठरल्याप्रमाणे पैशांच्या बदल्यात दागिनेही देत नव्हता आणि दागिने नाहीत तर त्या बदल्यात आगोदरच दिलेले पैसेही परत करत नव्हता. अशा स्थितीत दावरवाडी येथील सदर तरुणाने सराफा कर्मचाऱ्यास सहा महिने संपर्कस साधला पण त्याला कोणतीही दाद मिळाली नाही. त्यातूनच या तरुणाच्या मनात असुरक्षीतता आणि राग निर्माण झाला आणि त्याने या पैशांचा बदला घेण्याचे निश्चित केले. (हेही वाचा, Mumbai Shocker: लेकीच्या अपहरणाची तक्रार घेऊन आला बाप अन त्याच्याच कूकर्माचा झाला उलगडा; पोटच्या लेकीवर 5 वर्ष करत होता लैंगिक अत्याचार)
Live kidnapping footage.
महाराष्ट्र का संभाजी नगर में किडनैपिंग का मामला.
किडनैपिंग सीसीटीवी में कैद.
आरोपियों ने अपने पैसे मांगने गए थे, नहीं देने पर पीड़ित को किडनैप कर के ले गए.
पीड़ित परिवार से मांगी 8 लाख की फिरौती.
पुलिस की पीड़ित को किडनैपर के चुंगल से रिहा करवाया. pic.twitter.com/ywCamjytyf
— Vivek Gupta (@imvivekgupta) January 10, 2025
सराफा दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीस दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी दावरवाडी येथील तरुणाने चक्क त्याच्या अपहरणाचा कट रचला. त्याने काही साथीदारांना सोबत घेतले आणि चक्क शहरातील सीटी चौक गाठला. या परिसरातील मीना फंक्शन येथील हॉलच्या मागे असलेल्या गल्लीत त्याने आपल्या साथीदारांसोबत सराफा कामगारास गाठले आणि त्याचे अपहरण केले. ही गटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, चार-पाच इसम मिळून एका व्यक्तीस जबरदस्तीने पकडून खेचत आहे. त्यांनी त्या इसमास जबरदस्तीनेच एका चारचाकी वाहनात बसवले आणि त्याला घेऊन ते काहीच सेकंदामध्ये गायबही झाले.