छठपूजा photo :commons wikimedia

१३ नोव्हेंबारला देशभरात दिवाळी पाठोपाठ आता छठपूजेचा उत्सव रंगणार आहे. प्रामुख्याने उत्तर भारतात छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात छठपूजा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय बनली आहे. यामधून रंगणारा राजकारण हा देखील त्याच्याच एक भाग आहे. ठाण्यात यंदा छठपूजेवरून मनसे अधिक आक्रमक झाली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात प्रशासनाने निर्माल्य नेण्यास बंदी घातली होती. यंदा ठाण्यात उपवन, तलावपाळी भागात छठपूजेच्या वेळेसही निर्माल्याचा कचरा मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न मनसेने विचारला आहे. छठपूजेला परवानगी दिली तर आम्ही माणसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. छठ पूजा 2018 : धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... पवन सिंहचं भोजपुरी गाणं सोशल मीडियात व्हायरल

मुंबई, ठाणे, नाशिक या भागात परप्रांतियांची वाढती गर्दी पाहता अनेक समस्या वाढत आहेत. त्यावरून अनेक वर्ष परप्रांतियांविरोधात मनसे आक्रमक पवित्रा घेत आहे. त्यामुळे यंदा ठाण्यात छठपूजेदरम्यान राजकीय वातावरण कसे आणि किती तापणार ? प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.