दिवाळी पाठोपाठ आता उत्तरभारतामध्ये छठ पूजेच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने बिहार आणि झारखंड मध्ये छठ पूजा मोठ्या धामधूमीत साजरी केली जाते. भोजपुरी कलाकार या उत्सावासाठी खास गाणी बनवतात. यंदा भोजपुरी गायक पवन सिंह यांनी देखील खास गाणं रचलं आहे. सोशल मीडियामध्ये या गाण्याची खास धूम आहे.
छठ पूजेमध्ये छठी मय्याचं पूजन केलं जातं. परंतू पवन सिंहने रचलेल्या गाण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग आहे. मोदी छठी मय्याकडे पुन्हा मला पंतप्रधान पदी विराजमान कर अशी विनवणी करत असल्याचा आशय आहे. अवघ्या काही दिवसातच या गाण्याला युट्युबरवर ७ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हे गाणं झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धइलें नरेंद्र मोदी माथे दऊरवा... असे गाण्याचे बोल आहे. विनय बिहारी यांनी हे गाणं लिहलं आहे तर ओम झा यांनी या गाण्याचं संगीत दिगदर्शन केलं आहे. गायक पवन सिंह यांच्या आवाजातील हे गाणं देखील तुफान लोकप्रिय होत आहे. यापूर्वी 'माई रोअत होइहें', 'गोदिया में होइहे बालकवा'या गाण्यांनीही सोशल मीडियाला वेड लावलं होतं.