न्यायालयात आपली ओळख आहे. चेक बाऊन्स (Check Bounce Cases) आणि फसवणूक प्रकरणात आपण न्यायालयीन मदत करु शकतो, अशी फुशारकी मारुन व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केले प्रकरणी एकास पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने व्यवसायिकाडून तब्बल पाच कोटी रोख (Extort 5 Crore) आणि तब्बल 32 लाख रुपयांच्या मौल्यवान दागिणे मिळवले. आरोपींचे नाव लक्ष गुरमीत सहारन आणि हनुमंत कांबळे असे आहे. त्याच्यासोबत त्याच्या इतरही सहकाऱ्यांना अटक केल्याचे समजते. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) क्राईम इंटेलिजन्स युनिटने (Crime Intelligence Unit) ही कारवाई केली.
कारवाई टाळण्यासाठी कायदेशीर सल्ला
आरोपी लक्ष गुरमीत सहारन हा तक्रारदाराच्या संपर्कात होता. तक्रारदार हा देखील मोठा व्यवसायिक असल्याचे समजते. तक्रारदारावर सन 2020 मध्ये घडलेल्या एका प्रकरणात चेक बाऊन्स प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी तो कायदेशीर सल्ला शोधत होता. दरम्यान, आरोपी तक्रारदाराच्या संपर्कात आले. त्यांनी त्याला या प्रकरणात आपण नक्की मदत करु शकतो, असे आमिष दाखवले. आरोपींनी संगनमताने एका अनोळखी व्यक्तीशी बोलायलाही सांगितले. सदर आरोपीनेही आपण महत्त्वाच्या पदावर काम करत असून कोर्टातही आपली चांगली ओळख असल्याचे सांगितले. (हेही वाचा, New Cheque Bounce Rules: सावधान! चेक बाऊन्स प्रकरणी सरकार कठोर नियण बनवण्याच्या तयारीत)
तक्रारदाराकडून उकळले पैसे
दरम्यान, आरपींनी तक्रारदारांकडून कोर्टातील कारवाईसाठी मोठी रक्कम द्यावी लागणार असल्याचे सांगत तक्रारदाराकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात 10 लाख, नंतर 20 आणि पुढे 50 लाख त्यांनी तक्रारदाराकडून उकळले. हा दिनक्रम पुढे चालतच राहिला. अखेर जवळपास 5 कोटी रुपयांची रक्कम आणि आणि जवळपास 32 लाख रुपयांचे दागिणे डावावर लावूनही हाती काहीच लागले नाही. तेव्हा तक्रारदारास आपण फसवले गेल्याची भावना मनात येऊ लागली. त्याने आरोपींच्या या गंभीर कृतीबाबत सीबीआय आणु मुंबई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. (हेही वाचा, चेक बाऊंस प्रकरणी मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारला विशिष्ट कालावधीसाठी अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याचा कायदा करण्याची SC ची सूचना)
आरोपींनी तक्रारदारांसोबत मोठ्या चाणाक्षपणे खेळ खेळला. न्यायालयातील अधिकारी म्हणून बोलणाऱ्या संभाव्य व्यक्तीची आणि तक्रारदाराची आरोपींनी कधीही भेट होऊ दिली नाही. उलट ही भेट कशी टाळली जाईल, याकडेच अधिक लक्ष दिले. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. पोलिसांनी सूत्रधाराचा शोध घेत घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार लक्ष गुरमीत सहारन, त्याचे साथीदार, पीडितेचा ड्रायव्हर आसिफ आणि कांबळे यांना अटक करण्यात आली. आरोपींनी आणखी काही लोकांना असेच फसवले आहे का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.