Anvay Naik प्रकरणी अर्णब गोस्वामी विरोधात आरोपपत्र दाखल, उद्या अलिबाग सत्र न्यायालयात होणार सुनावणी
Arnab Goswami (Photo Credits-Twitter)

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी (Anvay Naik Suicide Case) आता रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून उद्या अलिबाग सत्र न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. मुख्य म्हणजे या आरोपपत्रामध्ये कंत्राटदार फिरोझ शेख आणि नितेश सारडा या दोन आरोपींसह रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांचा समावेश आहे. यांनी अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप यात लावण्यात आले आहेत.

अलिबाग सत्र न्यायालयात अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. याच्यासंबंधीत सदर करण्यात आलेल्या आरोपपत्रात रायगड पोलिसांनी एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. उद्या या आरोपपत्रावर निश्चितीची प्रक्रिया पार पडेल. यासाठी अर्णब गोस्वामीसह अन्य दोन आरोपींची न्यायालयात उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.हेदेखील वाचा- Anvay Naik Suicide Case: त्या वेळी किरीट सोमय्या यांची बोबडी वळली होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपांवर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केले होते. हे प्रकरण 2018 मधील आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने 5 मे 2018 या दिवशी आत्महत्या केली होती. अलिबाग येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता. आत्महत्या केली होती.