धुळे महानगरपालिका महापौर पदी भाजपचे चंद्रकांत सोनार विराजमान !
Dhule Municipal Corporation | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Dhule Mayor Election : धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपाने 74 जागांपैकी 50 जागा भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.  आज या महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. महापौरपदी भाजपाचे चंद्रकांत सोनार (Chandrakant Sonar) महापौरपदी विराजमान झाले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी माघार घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. अहमदनगर: शिवसेनेच्या बहिष्कारामुळे, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर

कोणत्या पक्षाच्या किती जागा?

काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 14 जागा, शिवसेना 2, एमआयएम 2, समाजवादी पार्टी 2, बसपा 1 आणि अपक्ष 2 जागांवर विजयी झालेत. तर भाजपाने 74 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.

धुळे महानगरपालिका निवडणूक भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यामुळे चर्चेत आली होती. भाजपा पक्षांतर्गत राजकारणावर टीका करत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप विरुद्ध आमदार अनिल गोटे अशी ही निवडणूक रंगली. पण या निवडणुकीत गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा एकच उमेदवार निवडून आला.