Centralised Admission Process FYJC 2022-23: 11वी प्रवेशप्रक्रियेचं वेळापत्रक जारी; 30 मे पासून भरता येणार भाग 1
First Year Admission | Representational Image | (Photo Credits: PTI)

जून महिन्यात यंदा राज्य शिक्षण मंडळ 10वी,12वीचा निकाल लावणार आहेत. त्यानंतर 11वी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. यंदा 11वी प्रवेशप्रक्रियेमध्ये (FYJC Admission) अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी 30 मे पासून सुरू होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.

11वी प्रवेशप्रक्रियेत भाग 1 भरण्यासाठी 23-27 मे दरम्यान सराव करता येणार आहे. त्यापूर्वी कॉलेजच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे देखील नक्की वाचा: FYJC Mock Admission प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल 23 मे नंतर सुरू होणार अर्ज प्रक्रिया .

वर्षा गायकवाड ट्वीट

11वी प्रवेशासाठी नोंदणी सरावाकरिता 23-27 मे चा कालावधी असेल. त्यानंतर 30 पासून पासून ऑनलाइन नोंदणी व प्रवेश अर्ज भाग १ भरणे लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल. फॉर्मचा भाग 2 हा दहावीच्या निकालानंतर भरता येणार आहे.अद्याप 10वी निकालाची तारीख जाहीर झालेली नाही पण 20 जून पूर्वी निकाल लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे.