प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

कल्याणजवळ जुना पत्री उड्डाणपुलाचे काम चालू करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या रविवारी मध्य रेल्वेने पॉवर ब्लॉक घेणार असून  140 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य रेल्वेचा हा सहा तासांचा  ब्लॉक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अंधेरीमध्ये पुल कोसळून खाली पडलेल्या दुर्घटनेनंतर सर्व पुलांची पाहणी केली होती. त्यात पत्री पुल हा धोकादायक असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे 18 ऑगस्टपासून या पुलावरील लहान वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. या पुलाचे काम आता नव्याने होणार असून राज्य रस्ते विकास महामंडळ या ठिकाणी दोन पदरी पूल बांधणार आहेत.

या कारणास्तव मध्य रेल्वेवरील पूलाचा काही भाग पाडण्यात येणार असल्याने रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर या ठिकाणी असलेल्या एमएसईबीच्या केबल, पाईपलाईन आणि ऑप्टिक फायबर केबलसुद्धा हटविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.