Central Railway Special Trains:  गणेश उत्सवाच्या निमित्त  मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या घेणार पेण स्टेशनला थांब!
Central Railway- special train for Ganpati utsav

Central Railway Special Trains : गणपतीला गावाला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून  खुशखबर आली आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) गणपती उत्सवादरम्यान ( Ganesh Utsav)  चाकरमन्यांचे प्रवास सुखकर व्हावे यासाठी विशेष गाड्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. मध्य रेल्वेने या बाबत ट्विटरवर माहिती शेअर केली आहे. गणेशउत्सवाचा आंनद घेण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या आता पेण स्टेशनला (Pen Station) थांबा घेणार आहे. गणेशउत्सावासाठी मोठ्या संख्येने चाकरमाणी गावाला जात  असतात. दरवर्षी प्रशानामार्फत विशेष गाड्या सोडण्यात येतात. यंदाही मध्य रेल्वे याकडे लक्ष घालत आहे.

मध्यरेल्वेने ह्या दिवसांची गर्दी लक्ष्यात घेता गणपती सणाच्या दोन दिवसांपुर्वी विशेष 156 गाड्या धावणार असल्याचे घोषित केले आहे. ह्या विशेष गाड्या मुंबई ते सांबतवाडी रोड, लोकमान्य टिळक टर्मिनल ते कुडाळ, दिवा ते रत्नागिरी, मुंबई ते महाड दरम्यान धावणार आहे. विशेष गाड्यांच्या 80 फेऱ्यांना पेण स्टेशनवर थांबा घेणार आहे. असे मध्य रेल्वेने जाहिर केले आहे.

प्रवासाची मागणी लक्ष्यात घेत मध्य रेल्वेने पेण स्टेशनवर थांबा घेण्याचे जाहिर केले आहे.  गाडी क्रमांक01171/72- CSMT-सावंतवाडी विशेष- ४० फेऱ्या  आणि  गाडी क्रमांक 01153/54- दिवा- रत्नागिरी विशेष- ४० फेऱ्या घेणाऱ्या गाड्या धावणार आहे. 

रेल्वे आरक्षण तिकिट लवकरच सुरु होणार आहे. 156 गणपती विशेष गाड्यांचे आराक्षण 27 जून २०२३ पासून चालू होणार आहे. ऑनलाइन पध्दतीने आयआरटीसीच्या संकेतस्थळा वरुन  सुरु होणार आहे.