गौतम बुद्ध यांचा अयोध्याशी जवळचा संबंध असल्याने राम मंदिर बनवायला हवे- केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

गेल्या बऱ्याच वर्षांपासून निलंबित असलेला अयोध्या (Ayodhya) खटल्याचा निर्णय अखेर 9 नोव्हेंबर रोजी लावण्यात आला. सुप्रीम कोर्टाने निर्णय देत असे स्पष्ट केले होते की, मशिदीसाठी 5 एकj जागा देण्यात येणार आहे. 2010 मध्ये अयोध्या जमीन वाद हा तिन्ही पक्षकारांना समसमान वाटा देऊन संपवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र यावर सर्वांची संमती न झाल्याने हा वाद पुढे नेण्यात आला होता, मात्र अखेरीस सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांच्या समवेत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल मार्गी लावला. तर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिर प्रकरणी त्यांचे मत स्पष्ट केले आहे.

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निकाल देताना मुख्य वादग्रस्त भूमी ही रामल्लाच्याच हक्काची असल्याचे मान्य केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ट्र्स्टची स्थापना सुद्धा करण्यात आल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रामदास कदम यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, गौतम बुद्ध यांचा अयोध्येशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे तेथे राम मंदिर बनायला हवे. तसेच मुस्लिम समाजाला सुद्धा देण्यात आलेल्या जागेवर मस्जिद बांधायला हवे. एवढेच नाही तर तेथे बुद्ध यांचे मंदिर सुद्धा असायला हवे.(अयोद्धेमध्ये साधू संत राम मंदीरासाठी 21 फेब्रुवारीला रचणार पहिली वीट, प्रयागराज येथे शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर)

ANI Tweet:

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधिशांनी ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर विविध राजकीय नेत्यांसह नागरिकांनी याचे स्वागत केले होते. भारत आणि जगातील बहुतांश नागरिकांच्या मनात रामजन्मभूमीबाबत एक विशेष भावना आहे. राम आणि रामायण, भारताची संस्कृती, सभ्यता यांना फार महत्व दिले जाते.