Bull Attacked In Pimpri Chinchwad | | (Photo Credits: CCTV Footage/Facebook)

Bull Attacked In Pimpri Chinchwad CCTV footage: शहरात फिरणारे मोकाट वळू हे सध्या पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात चिंतेचा विषय ठरला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या वळूने 79 वर्षाच्या अजोबांना धडक दिली. या घटनेत अजोबांचा जागीच मृत्यू झाला. आनंद सिंग (Anand Singh) असं आजोबांचं नाव आहे. मोकाट वळूने आनंद सिंग यांना अक्षरश: शिंगावर उचलून फेकून दिले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज व्हायरल झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना पिंपरी चिंचवड येथील बोपखेल येथे घडली. आनंद सिंग हे 79 वर्षी गृहस्त रस्त्यावरुन जात होते. ते जात असलेल्या रस्त्याच्या बाजूलाच मोकाट वळू बसला होता. आनंद सिंग वळूजवळून पुढे गेले. ते जात असताना वळू शांत बसला होता. मात्र, सिंग हे पुढे गेल्यावर वळू अचानक उठला आणि त्याने थेट आनंद सिंग यांना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भयावह होती की, आनंद सिंग हे हावेत उडाले आणि जमिनीवर आपटले. (हेही वाचा, अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना फेरीवाल्यांची मारहाण; पोलिसी खाक्या दाखवत चार जण ताब्यात (व्हिडीओ))

अचानक घडलेल्या प्रकारामुळे आनंद सिंग यांना कमालीचा धक्का बसला. तसेच, हवे उडून खाली पडल्यामुळे ते प्रचंड जखमी झाले. रक्त आले नसले तरी, शरीरात अंतर्गत जखमा झाल्या. त्यांना मुकामारही मोठ्या प्रमाणावर लागला होता. आनंद शर्मा यांना दुखापत झाल्याचे ध्यानात येताच प्रत्यक्षदर्शींनी त्यांना दवाखान्यात तातडीने नेले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. या प्रकारानंतर रस्त्यावरुन मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न आणि नागरिकांची सुरक्षीता हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.