Mumbai News: प्राण्यांमध्ये असलेले मातृप्रेम आणि आपल्या आवडत्या ठिकाणांचे स्मरण चकीत करणारे असते. याचा प्रत्यय मुंबई येथील चेंबुर परिसरात राहणाऱ्या अनिकेत भोंडवे यांना आला. भोंडवे हे आपल्या कारने पनवेलला गेले होते. पनवेलहून दिवसभर प्रवास करुन आल्यानंतर त्यांना कारच्या इंजिनमधून काहीसा आवाज येताना दिसला. त्यांनी कुतुहलाने पाहिले तर एक मांजर (Cat) आणि त्यांची चार पिल्ले (Kittens) इंजिनच्या पोकळीत बोनेटमध्ये अडकली होती. त्यांनी तत्काळ रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW) सोबत संपर्क साधला. संस्थेच्या स्वयंसेवकाच्या मदतीने मांजर आणि त्यांच्या पिल्लांची सुखरुप सुटका करण्यात आली.
मांजरीची पुन्हा एकदा सुटका
मांजरीची सुटका झाल्यावर भोंडवे ही घटना विसरुनही गेले. पण, ते संध्याकाळी कामावरुन परतले असता त्यांना पुन्हा ती मांजर आणि तिची पिल्ले गाडीच्या इंजिनजवळ गुटमळताना दिसली. ज्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पुन्हा एकदा RAWW सोबत संपर्क साधला. RAWW चे स्वयंसेवक राजेश महाडिक आणि अनिकेत यांनी मांजरीची पुन्हा एकदा सुटका केली. (हेही वाचा, Funeral On a Pet Cat: पाळीव मांजरावर नागरी स्मशनभूमीत अंत्यसंस्कार, सहा जणांवर गुन्हा दाखल)
आक्रमक मांजर जीव वाचताच पळाली
मांजराच्या या कुतुहलजनक घटनेबद्दल सह-बचावकर्ता सिद्धांत धनावडे यांनी सांगितलेकी, अनिकेत यांनी आदल्याच दिवशी पनवेलमध्ये दिवसभर प्रवास केला होता. हा प्रवास केल्यावर ते घरी आले तेव्हा त्यांना इंजनच्या पोकळीत मांजर दिसली. आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ती आक्रमक होती. बहुदा तिची पिल्ले सोबत असल्यामुळे असावी. मी हातमोजे घालून तिला बाहेर काढले. दिवसभर गाडीतच राहिल्याने बहुदा तिला भूक लागली असावी. पण, बाहेर येताच ती धूम पळाली. दिसेनासी झाली. त्यानंर आम्ही पिल्लांनाही बाहेर काढले. आम्हाला वाटले ती पिल्लांना सोडून गेली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा त्याच ठिकाणी आली. (हेही वाचा, World's Richest Pet: 800 कोटींची मालक आहे ही मांजर; जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत Olivia Benson चा लागतो तिसरा क्रमांक)
उष्णतेसाठी प्राण्यांचा वाहनाजवळ आश्रय
प्राणीमित्रांनी सांगितले की, कधी कधी बाहेरचे तापमान कमी होते. वातावरणात थंडी असते तेव्हा प्राणी उबदार ठिकाणाच्या शोधात असतात. दिवसभर प्रवास केल्याने वाहनाचे इंजिन गरम असते. त्यामुळे इंजिनची उब शरिराला उष्णता देत असल्याे प्राणी अशी नवाऱ्याची जागा शोधतात. ही मांजरही आपल्या पिल्लांना घेऊन त्याचसाठी आली असावी असे वाटते. मांजरीने कारच्या बोनेटमध्ये कसा प्रवेश केला या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मिळू शकले नाही.
(हेही वाचा, Cat News & Pune Crime : मांजर मेल्याचा राग, मालकाकडून पशुवैद्यकीय डॉक्टरला मारहाण, पायाला फ्रॅक्चर)
मांजर या प्राण्याबद्दल अनेक समाजात समज-गैरसमज पाहायला मिळतात. सांगितले जाते की, कितीही उंचावरुन पडले, फेकले तरी मांजर नेहमी पायावरच पडते. दुसरे म्हणजे मांजर आपले राहते ठिकाण कधीही विसरत नाही. इतकेच नव्हे तर, मांजराला तुम्ही कोठेही घेऊन जा त्याने रस्ता पाहिला तर ते विसरत नाही. ते पुन्हा आपल्या ठिकाणी येते. मांजर आडवे गेले तर कार्य सिद्धीस जात नाही, असे अनेक समज गैरसमज समाजात पाहायाल मिळतात.