मुंबईत 30 वर्षीय तरुणाने मस्करीच्या नादात मांजरींच्या पिल्लांना जीवंत जाळले
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Pixabay)

मुंबईतील (Mumbai) मिरारोड (Mira Road) येथील एका 30 वर्षीय तरुणाने मस्करीच्या नादात मांजरीच्या 3 वर्षीय पिल्लांना जीवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. तर घराच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यास त्यांनी मांजरींच्या पिल्लांना आगीतून बाहेर काढले.

या प्रकरणी पिल्लांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यामधील एका पिल्लाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धेश पटेल असे या तरुणाचे नाव आहे. याच्या विरोधात शेजारच्यांनी गुन्हा दाखल केल्यास सिद्धेशने मस्करीच्या नादात पिल्लांना जाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण दिले.(मुंबईकरांनो सावधान! राणीच्या बागेत होतंय बिबट्याचे आगमन, जून 2019 पासून घेता येणार भेट)

तर सिद्धेश राहत असलेल्या इमारतीत 50 पेक्षा अधिक भटक्या मांजरी राहतात. तसेच येथील रहिवाश्यांना या मांजरींबद्दल कोणतीच तक्रार नाही आहे. तर सिद्धेशने मध्यरात्री घराबाहेर असलेल्या पिल्लांना जाळत असल्याचे चित्र सीसीटिव्हीत पाहायला मिळाले आहे. परंतु पटेल ह्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.