कोल्हापूरातील (Kolhapur) उद्योजक संतोष शिंदे (Businessman Santosh Shinde Suicide Case) यांच्या आत्महत्येनंतर शहरात खळबळ माजली आहे. या आत्महत्येच्या तपासात पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये नाव असलेल्या माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि पोलिस अधिकाऱ्याला आता बेड्या घालण्यात आल्या आहे. कोल्हापूर पोलिसांच्या टीमने दोघांना सोलापुरातून ताब्यात घेत ही कारवाई केली आहे. दोघेही सोलापूर मध्ये एका हॉटेलमध्ये लपले होते.
कोल्हापूरातील गडहिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. यामागे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि आणि पोलिस अधिकारी राहुल राऊत यांनी त्रास दिल्याचं कारण समोर येत आहे. संतोष शिंदे हे अर्जुन समूहाचे प्रमुख होते. खोट्या गुन्ह्यात अडकण्यासोबतच माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि पोलीस अधिकारी राहुल राऊतने एक कोटीच्या खंडणीसाठी केलेला मानसिक छळ यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्यांच्या सुसाईड नोट मध्ये आहे. नक्की वाचा: Kolhapur News: विष प्राशन केल्यावर फिरवली गळ्यावर सुरी, उद्योगपती संतोष शिंदे यांची बायकामुलांसह आत्महत्या; कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ .
संतोष यांच्यावर महिनाभरापूर्वी कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्यांना अटक होऊन 20-25 दिवस ते जेलमध्ये होते. यामुळे त्यांना नैराश्य आलं होतं सोबतच त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहत्या घरी विष पिऊन गळ्यावर चाकू फिरवत जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आत्महत्येचा धक्का त्यांच्या आईने घेतला आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांनाही हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.