पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौर्यावर आहे. महाराष्ट्रात ते शिर्डी (Shirdi) मध्ये साईबाबा संस्थानच्या मंदिरात दाखल झाले आहे. पण दुसरीकडे मराठा समाज राज्यभर आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असताना त्याचा रोष मोदींच्या दौर्यासाठी निघालेल्या बसवर देखील निघाला आहे. नागरिकांना मोदींच्या सभेला आणायला निघालेल्या गाड्या परत पाठवण्यात आल्या आहेत. अनेक गावात नेत्यांना बंदी केली आहे. शेवगाव मध्येही मठाचीवाडी येथील मराठा समाजाने आक्रमक होत मंत्री विखे यांच्या कुटुंबीयांचा विरोध केला आहे. PM Narendra Modi Visit Shirdi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीत घेतले साईबाबाचे दर्शन, सोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली उपस्थिती .
शेवगाव मधील भातकूडगाव मध्ये मोदींच्या सभेला निघालेल्या बस अडवण्यात आल्या. अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावात नेत्यांना गावबंदी केली जात आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची गाडी देखील अडवण्यात आली आहे. अहमदनगर मध्ये काही एसटी गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. मोदींच्या सभेला जाण्यासाठी 1000 बस सोडण्यात आल्या आहेत. पण अनेक गाड्या गावकर्यांनी पुढे सोडण्यास मज्जाव केला आहे.
2018 मध्ये साई समाधी शताब्दी सोहळ्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते त्यानंतर आज पाच वर्षांनी पंतप्रधान मोदी साई समाधीचे दर्शन घेतले आहे.
मराठा आरक्षण
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी अन्न,पाणी, वैद्यकीय मदत न घेता उपोषण सुरू केले आहे. पण यावेळी त्यांनी मराठा समाजाला संयम बागळत, कोठेही आक्रमक न होता, आत्महत्येसारखी टोकाची पावलं न उचलता आरक्षणासाठी समर्थन देण्याचं आवाहन केले आहे.