Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यात कार आणि बसचा अपघात, एक वकिल ठार, 6 गंभीर जखमी
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील चिखली देऊळगाव राजा मार्गावरील बेराळा फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ठार झालेल्या व्यक्तीचे नाव ऍड. बी.के. सानप असे आहे. सानप हे बुलडाणा(Buldhana) जिल्हा न्यायालयात वकिली करत असत. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कार आणि बस (Car and Bus Accident) यांच्यात हा अपघात घडला. या वेळी ऍड. बी.के. सानप यांच्यासोबत ऍड. रमेश भागीले हे देखील होते. ऍड. रमेश भागीले या अपघातात गंभीर जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार, ऍड. बी.के. सानप हे ऍड. रमेश भागीले यांना सोबत घेऊन आपल्या मुलाच्या शालेय प्रवेशासाठी औरंगाबाद येथे गेले होते. औरंगाबादवरुन परतत असताना सानप यांचे आपल्या भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्झरी बसला धडकली. ही धडक इतकी जोरात होती की बससु्धा बाजूच्या शेतात जाऊन उलटली. बसमधील 5 प्रवासी किरकोळ जखमी असल्याचे समजते. (हेही वाचा, Railway Accident: धावत्या ट्रेनमधून नदीत कोसळल्याने 18 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू, भंडारा येथील घटना)

दरम्यान, ज्या बसला सानप यांच्या कारने धडक दिली ती पुण्याच्या दिशेने निघाली होती. या अपघातात ऍड. बी.के. सानप हे जागीच ठाकर झाले. तर त्यांच्या सोबत असलेले भागीले हे जखमी झाले. जखमींना जवळच्याच चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.