गोवंडी परिसरात दुमजली इमारत कोसळली, 8 जण जखमी
Building Collasped (Photo Credits: File Photo)

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याबरोबर इमारती कोसळल्याच्या घटना दिवसागणिक ऐकायला मिळतात. त्यातच मध्यरात्री गोवंडीत दुमजली कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत इमारतीचा वरचा भाग कोसळून 8 जण जखमी झाले आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोवंडी येथे शिवाजी नगर परिसरात दुमजली इमारतीचा भाग कोसळून त्यात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यापैकी झुबेदा बेगम सय्यद(७०), आयेशा बानू सय्यद(२१), नूरजहाँ बानू सय्यद (४५) या तिघींच्या प्रकृतीत सुधारणा आहे, तर इतर पाचही जणांवर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मालाड (Malad) येथे पिंपरीपाडा (Pimpripada) परिसरात 2 जुलैच्या मध्यरात्री इमारतीची संरक्षक भिंत कोसळली होती. आता याच मालाड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढून 21 वर तर जखमींची संख्या 78 च्या वर गेली आहे.

हेही वाचा- Malad Wall Collapse Incident: मालाड दुर्घटनेत 21 जणांचा नाहक बळी, जखमींची संख्या पोहचली 78 वर, अग्निशमन दलाचे बचावकार्य अद्याप सुरु

महाराष्ट्राला झोडपून काढलेल्या पावसाने मालाडप्रमाणेच कल्याण आणि पुण्यातही भिंत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये एकत्रितरित्या तब्बल 30 हुन अधिकांना प्राण गमवावे लागल्याचे समजत आहे.