Mahesh Manjrekar | ( Archived, edited, symbolic images )

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाचा सध्या दिलासा मिळाला आहे. मांजरेकर यांना सिनेमा ‘नाय वरण भात लोन्चा, कोण नाय कोन्चा’सिनेमातील आक्षेपार्ह सिन्स मुळे कारवाईला सामोरं जावं लागत आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने या सिनेमाविरोधात तक्रार करण्यात आली होती. पण मुंबई कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत सिनेमाच्या दिग्दर्शक, निर्मात्यांना कठोर कारवाईपासून संरक्षण दिले आहे.

महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरण भात लोन्चा, कोण नाय कोन्चा’सिनेमामध्ये काही बोल्ड सीन्स आहेत. दरम्यान या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासूनच त्याची चर्चा सुरू झाली होती. सुरूवातीला युट्युब वरून हा ट्रेलर काढून टाकण्याची मागणी झाली. त्यानुसार ट्रेलर हटवत आणि काही सिन्स ला कात्री लावत सिनेमा रिलीज झाला. पण महिला आयोगानेदेखील या सिनेमाविरूद्ध आवाज उठवला. सिनेमातील काही दृश्यांना राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेत दिग्दर्शकासह लहान मुलांच्या पालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. नक्की वाचा: Mahesh Manjrekar: मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्याबद्दल महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.

पॉक्सो कायद्याच्या कलम 14 अंतर्गंत कारवाई करण्यात आली आहे. या कलमानुसार इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट अथवा कोणत्याही टीव्ही मालिकेतून मुलांवर अश्लिल पद्धतीने चित्रीकरण करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिले आहे.