Pleas against Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण जाहीर केल्यानंतर समाजात हळूहळू त्यासाठी विरोध सुरू होण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने सरकारची बाजू प्रसिद्ध वकील हरीश साळवे (Harish Salve) मांडणार आहेत तर मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) मांडणार आहे. आज या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
आज नेमकी कशावर सुनावणी होण्याची शक्यता ?
राज्यातील कंत्राटी कर्मचार्यांनी मराठा आरक्षण आणि राज्यात सरकारी कार्यालयांमध्ये होणार्या मेगाभरतीला विरोध केला आहे. यासंदर्भामध्ये न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील कंत्राटी कर्मचार्यांनी मेगाभरतीपूर्वी त्यांना कायमस्वरूपी करून घ्यावं अशी मागणी केली आहे. सध्या राज्यात सुमारे 3 लाख कंत्राटी कामगार आहेत. यामध्ये बहुसंख्य मराठा समाजातील तरूण असल्याचा दावा करण्यात आला आहे. या तरूणांना राज्य सरकारने सेवेमध्ये रूजू करून घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयात आज या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. (नक्की वाचा : महाराष्ट्र राज्य नोकरभरती : 72 हजार पदे, जाणून घ्या कोणत्या विभागात किती जागा? )
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाला न्यायलयात आव्हान देण्यात आले आहे. मराठा समाजामुळे राज्यात आरक्षण 50% च्या वर गेले आहे. हा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करणारे आहे. हे संविधानाच्या तरतूदी विरोधात असल्याचं वकील गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणन आहे. दरम्यान 10 डिसेंबर 2018 रोजी न्यायालय परिसरामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांना हाणामारी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर सदावर्ते यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.