मराठा क्रांती मोर्चा ( प्रातिनिधिक फोटो) (Photo Credits: PTI)

Attack On Ad. Gunaratan Sadavarte : मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी होणार होती. दरम्यान मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकेची कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratan Sadavarte) यांच्यावर आज कोर्ट परिसरामध्ये हल्ला करण्यात आला आहे. वैजनाथ पाटील असे या तरूणाचे नाव आहे. 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देत त्याने गुणवर्तेंवर हल्ला केला. सध्या हा तरूण पोलिसांच्या ताब्यात आहे.

अ‍ॅड. गुणवर्ते हे मीडियाशी बोलताना संभाव्य हल्ल्याची माहिती देत होते. अशाच वेळी तरूणाने समोरून येऊन गुणवर्तेंना हाणामारी केली. हजारोंहून अधिक धमकीचे फोन आल्याचे, काही लोकं माझ्या आसपासच्या परिसराची रेकी करून गेल्याचे सदावर्ते यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. सदावर्ते यांच्या ते बेसावध असताना हल्ला झाला. झटापटीदरम्यान त्यांचा चष्मा खाली पडला. तितक्यात जवळच उभ्या असणार्‍या पोलिसांनी हल्लेखोर तरूणाला ताब्यात घेतले.

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1992 मध्ये एका प्ररणात निर्णय देताना 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राज्यात आगोदरच 50 टक्के आरक्षण असताना राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे, असा दवा करत डॉ. जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत नव्या कायद्याला आव्हान दिले आहे. त्यामुळे आरक्षण कायद्यावर न्यायालय काय निर्णय देणार यााबत उत्सुकता आहे.