Dr Jaishri Patil and Anil Deshmukh | Photo Credits: ANI and PTI

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह ( Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांनी एका लेटरबॉम्ब च्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर 100कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचे खळबळजनक आरोप केले होते. यावरून सध्या न्यायालयात गेलेल्या परमबीर सिंहांना कोर्टाने फटकारत त्यांची याचिका फेटाळली असली तरीही आज (5 एप्रिल) Dr Jaishri Patil यांची Writ Petition मान्य करत सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. Dr Jaishri Patil यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाने येत्या 15 दिवसांमध्ये परमबीर सिंहांनी केलेल्या देशमुखांवरच्या आरोपांवरून सीबीआय ला 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करून जर cognizable offence असेल तर FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान बॉम्बे हाय कोर्टाने परमबीर सिंह यांच्यासह अजून 2 दोन याचिका कोर्टात फेटाळल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी तुम्हांला गुन्हा ठाऊक होता मग त्याची तक्रार का नोंदवली नाही? असा सवाल विचारत फटकारले होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायलयातही सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी टाळत त्यांना उच्च न्यायलयात जाण्याचे आदेश दिले होते. Param Bir Singh criminal PIL against Anil Deshmukh:'गुन्हा घडला आहे हे माहित होतं मग FIR दाखल का नाही केली? बॉम्बे हायकोर्टाने Param Bir Singh यांना फटकारलं.

ANI Tweet

सध्या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनुसार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी API सचिन वाझेला मुंबईत बार आणि रेस्टॉरंट्सकडून 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिले आहेत. मात्र देशमुखांनी हे आरोप फेटाळले आहेत. सध्या राज्य सरकारकडून देशमुखांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी काही निवृत्त न्यायाधीशांची एक कमिटी बसवली आहे. त्यांच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल असा विश्वास देशमुखांनी वर्तवला आहे.