Water Supply Suspension: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ज्यामुळे भातसा नदीच्या धरणातील (Bhatsa River Dam) घटलेल्या पाण्याच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यात येईल. परिणामी ठाणे शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशांना पाणीपुरवठ्यात 30% घट (Thane Water Cut) जाणवेल. ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) संपूर्ण शहरात समान रीतीने पाणी वितरीत करण्यासाठी येत्या आठवड्यात विविध भागात 24 तास पाणी कपात करण्याची घोषणा केली आहे. ही कपात साधारण सलग पाच दिवस असेल. अर्थात, नागरीकांची प्रदीर्घ काळ गैरसोय टाळण्यासाठी ही पाणीकपात केवळ 24 तासच असेल, असा दावा पालिकेने केला आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची कारणे
बीएमसीच्या पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या भातसा नदीच्या पात्रावरील पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मधील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम रविवार, 1 डिसेंबर रोजी सुरू झाले आणि गुरुवार, 5 डिसेंबरपर्यंत सुरू राहील असे, शक्यता आहे. ज्यामुळे आणि भातसा नदीच्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे ठाण्याच्या पाणीपुरवठ्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. दरम्यान, पाणीकपातमुळे निर्माण होणारी आव्हाने कमी करण्यासाठी, टीएमसी सहा दिवसांसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी 9:00 ते सकाळी 9:00 पर्यंत विभागनिहाय पाणीपुरवठा स्थगित करेल. (हेही वाचा, Turbid Water Supply In Mumbai Alert: मुंबईतील काही भागात गढूळ पाण्याच्या तक्रारी; BMC ने पाणी गाळून, उकळून पिण्याचे केले आवाहन)
टीएमसीकडून नागरिकांना अवाहन
पाणीकपात काळात नागरिकांनी पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करावा. शिवाय पालिका अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन टीएमसीने केले आहे. रहिवाशांना आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा आणि तात्पुरत्या अडथळ्यांसाठी तयार राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ठाणे दिनांक प्रभावित भागातील पाणीपुरवठा स्थगिती वेळापत्रक
- मंगळवार, 3 डिसेंबरः माजीवाडा, मनपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकली, मनोरमा नगर, रनवाल, डोंगरीपाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबिल, आनंद नगर, कासारवडवली
- बुधवार, 4 डिसेंबरः गांधीनगर, सुभाषनगर, नलपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकारपाडा, सिद्धांचल, कोकणी पाडा, गावंद बाग, उन्नती, शास्त्रीनगर 1 आणि 2, मैत्री पार्क
- गुरुवार, 5 डिसेंबरः सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चराई, मावळी मंडळ, कोल्हापूर, गोकुळनगर, आझादनगर, खोपट, सिव्हिल हॉस्पिटल एरिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड
- शुक्रवार, 6 डिसेंबरः दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेती बंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंज ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर
- शनिवार, 7 डिसेंबरः रबोडी 1 आणि 2, आकाशगंगा, जेल टँक एरिया, जरी मारी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, अतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, खरेगाव, रघुकुल, पारसिक नगर
- रविवार, 8 डिसेंबरः लोकमान्य पाडा क्र. 1 आणि 2, दोस्ती, वेदांत, आकृति संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मेंटल हॉस्पिटल एरिया, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, एटर्निटी, विष्णू नगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाली, राम मारुती रोड रहिवाशांवर परिणाम
आठवडाभर चालणाऱ्या या व्यत्ययामुळे रहिवाशांच्या दैनंदिन दिनचर्येस काहीसा धक्का लागू शकतो. दरम्यान, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर 5 डिसेंबर रोजी सामान्य पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन टीएमसीने दिले आहे.