BMC Ward Division: मुंबई महापालिका निवडणुकीचा पाळणा लांबणीवर; प्रभाग रचनेसंदर्भात हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
BMC (File Image)

मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) होणार तरी कधी? हा सवाल राजकीय वर्तुळासह आता पालिका प्रशसनासही पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांची (BMC Ward Division) संख्या 236 वरुन पुन्हा एकदा 227 वर आण्याचा विद्यमान राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यावर सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने प्रभागांची रचना कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात दाखल दोन रिट याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळ्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार हे आता निश्चित झाले आहे.

राज्य सरकारने सुधारीत कायदा आणि नियमांचा आधार घेत मुंबईतल प्रभागसंख्या बदलली. परिणामी आता राज्य निवडणुक आयोगाला पुन्हा सर्व प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया नव्या प्रभागसंख्येनुसार करावी लागणार आहे. ही प्रभागरचना नव्याने करायची तर त्यात पुन्हा आणखी काही कालावधी जाणार. हा कालवधी साधारण चार ते सहा महिन्यांचाही असू शकतो. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप तरी मुहूर्त मिळेना असेच चित्र पाहायला मिळते आहे. (हेही वाचा, Aarey Forest Tree Case: सर्वोच्च न्यायायाचा MMRCL ला दणका; आरे जंगल प्रकरणी फटकारत ठोठावला 10 लाख रुपयांचा दंड)

मुंबई महापालिकेसोबतच राज्यभरातील जिल्हा परिषदांचाही विषय महत्त्वाचा ठरतो आहे. नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने 4 ऑगस्ट 2022 चा अध्यादेश काढला. तसेच, नंतरच्या कायदा दुरुस्तीद्वारे केलेल्या बदलांनाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. परिणामी हे प्रकरण कोर्टात प्रलंबीत आहे. इतकेच नव्हे तर ओबीसी आरक्षणावरील याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. अशा स्थितीत जोवर या याचिकांचा निकाल येत नाही, तोवर निवडणुकांचा मार्ग मोकळा होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.