मुंबई लोकल (Mumbai Local) ही शहरांतर्गत वाहतुकीसाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारा पर्याय आहे. मात्र लोकलच्या बाततीत अनेक अपघात घडलेले आहेत. मुख्यत्वे लोकल पकडता होणारी धावपळ तर सर्वात धोकादायक होय. अवघ्या काही सेकंदांसाठी लोकल ट्रेन स्टेशनवर थांबते मात्र ही लोकल पकडण्यासाठी अगदी झुंबड उडते. यात अनेक अपघात झालेले आपण पहिले आहेत. यावर रेल्वे मंत्रालयाने एक नवीन उपाय शोधून काढला आहे. आता लोकल सुरु होण्यापूर्वी रेल्वे सुटत आहे ह दर्शवण्यासाठी काही इंडीकेटर लावण्यात येणार आहेत. हे इंडिकेटर निळ्या रंगांचे असून गाडी सुटण्याच्या वेळी ही निळी लाईट ब्लिंक होणार आहे.
Safety First: मुम्बई में ट्रेन में चढ़ते यात्रियों के लिए कोच के गेट पर नीले रंग की लाइट लगाई जा रही है, जो यात्रियों को गाइड करेगी कि ट्रेन स्टार्ट हो गयी है, इससे अंत समय मे ट्रेन में चढ़ने से होने वाली दुर्घटनाओं पर रोक लगेगी pic.twitter.com/ElspYGcVDi
— Piyush Goyal (@PiyushGoyal) January 13, 2019
रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी स्वतः या गोष्टीच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हा निळ्या रंगाचा लाईट कसा काम करेल हे दर्शवण्यात आले आहे. म्हणजे तुम्ही ट्रेन पकडण्यासाठी जर धावत असाल आणि तुम्हाला जर ही लाईट दिसली तर समजा की आता ट्रेन सुटत आहे, (हेही वाचा : मुंबईकर रेल्वे प्रवाशांना 2019 पर्यंत Mumbai Local मध्ये Free WiFi मिळण्याची शक्यता)
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालय नेहमीच विविध पाऊले उचलत असते. या दृष्टीने मुंबईमधील अनेक स्टेशन्सचा कायापालट करण्यात आला आहे. सरकते जिने बसवण्यात आले आहे. त्यानंतर आता ट्रेन पकडण्यासाठी होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे ही निळ्या लाईटची उपाययोजना राबवणार आहे.