Explosion प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - ANI)

Chemical Factory Blast in Raigad: रायगड जिल्ह्यातील (Raigad District) एका रासायनिक कारखान्यात (Chemical Factory) गुरुवारी झालेल्या स्फोटात (Explosion) दोन कामगारांचा मृत्यू झाला. तसेच या स्फोटोत चार जण जखमी झाले आहेत. मुंबईपासून अंदाजे 110 किमी अंतरावर असलेल्या धाटाव एमआयडीसी, रोहा शहरातील साधना नायट्रो केम लिमिटेड (Sadhana Nitro Chem Limited) मध्ये सकाळी 11:15 वाजता स्फोट (Blast) झाला.

रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, केमिकल प्लांटच्या स्टोरेज टँकमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कामगार जागेवरच ठार झाले. तसेच यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांसह आपत्कालीन प्रतिसादकर्ते शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी त्वरीत घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रोहा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Sun Super Explosion: सूर्यावर एकाच वेळी 4 ठिकाणी भीषण स्फोट, पृथ्वीवर होऊ शकतो गंभीर परिणाम)

रायगडमधील साधना नायट्रो केमिकल कारखान्यात स्फोट -

दरम्यान, मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी बचाव आणि अग्निशमन कार्य अजूनही सुरू आहे.